आज दिनांक – 1 जुन 2023 रोजी 20 ते 25 यात्रेकरू सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा येथे नवसासाठी निघाले होते,त्यांच्या 407 वाहनाचा ढासाळवाडी जवळील वळणावर अपघात झाला. झालेल्या या अपघातात वीस ते पंचवीस यात्रेकरू गंभीर जखमी झाले होते त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ढासाळवाडी येथील नागरिकांच्या मदतीने उपचारार्थ हलविण्यात आले होते,यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी जाऊन जखमीचे विचारपूस केली तसेच डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यास सांगितले,सदर प्रवासी जालना जिल्ह्यातील काठोडा बाजार येथील यात्रेकरू आहेत. यात्रेकरूंमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांचा समावेश आहे. यावेळी सोबत दीपक तुपकर सचिन कोठाळे तसेच रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते…!