पो. डा. डोंबिवली प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदकुमार जोशी यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे.
सविस्तर वृत्त असेकी :-
पीडित महिला ही एका पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आहे. पोलिस अधिकारी हे जोशी यांचे मित्र आहेत. दरम्यान, घर रिकामी कर, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशा धमक्या देऊन शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेने जोशी यांच्यावर केला आहे. २०१८ ते एप्रिल २०२३ दरम्यान हा प्रकार घडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, जोशी यांनी विनयभंगाचा आरोप फेटाळला आहे. मी त्या महिलेला कधीही भेटलेलो नाही. विनयभंग प्रकरणाच्या विरोधात भाजपच्या वतीने गुरुवारी दि. १ जून 2023 सकाळी ११ वाजता आंदोलन छेडण्यात येणार आहे. पीडित महिलेचे पती पोलिस अधिकारी आहेत, त्या पती पत्नी मध्ये काही प्रकरणावरून वाद सुरू आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात विनयभंग आणि धमकावणे आदी गुन्ह्यांखाली नंदू जोशीं यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नंदू जोशी, भाजप पदाधिकारी, डोंबिवली: तिला कधी कॉलही केलेला नाही. तिचे पती पोलिस अधिकारी आहेत. ते माझे मित्र आहेत. त्या दोघांत वाद सुरु आहेत. मी पतीला मदत करतो असे तिला वाटते. पण माझा काहीही संबंध नाही. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले आहेत: