पो. डा.वार्ताहर पाचोरा, जळगाव,
सद्यस्थितीत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात दिवसेंदिवस गुन्हेगारी ने डोके वर काढत असून काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठिताच्या विरोधात ३७६ सारख्या गुन्ह्याची नोद झाली होती. या घटनेच्या तपासात पोलीस यंत्रणा व्यस्त असतांनाच दुसऱ्यादिवशी रात्रीच्या वेळी भरवस्तीत काही तरुणांनी एका तरुणावर चाकु, लाठ्या, कठ्यासह जीवघेणा हल्ला केला होता या एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असल्याने पोलीस यंत्रणेने बाबत जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.
या दोघ घटनांचा पूर्ण तपास व कारवाईचे कामकाज सुरु असतांनाच काल दिनांक २६ मे २०२३ शुक्रवार रोजी गोंदेगाव येथील कौतिक खाकरे हे गोंदेगाव येथुन शेंदुर्णी येथे बँकेतून पैसे काढण्यासाठी आले होते त्यांनी बॅंकेतून एक लाख नव्वद हजार रुपये काढले व मोटारसायकली वरुन शेंदुर्णी येथून गोंदेगाव येथे घराकडे जाण्यासाठी निघाले असता अंदाजे चार वाजेच्या सुमारास शेंदुर्णी ते गोंदेगाव दरम्यान पाठीमागून एका दुचाकीवरुन दोन तरुणांनी पाठलाग करत कौतिक खाकरे यांना हटकले व गाडी थांबवण्यासाठी भाग पाडले.
कौतिक खाकरे यांनी गाडी थांबवताच दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी आम्ही पोलीस आहोत आम्ही तुम्हाला केव्हापासून आवाज देऊन थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तरीही तुम्ही थांबले नाहीत अश्या भाषेत दमदाटी करत आम्हाला तुमची झडती घ्यावयाची आहे असे सांगत कौतिक खाकरे यांनी त्यांच्या दुचाकीच्या हॅंडलला टांगलेल्या थैलीतून हातात येतील तेवढ्या पैशाची गड्डी घेऊन परत शेंदुर्णी शहराकडे पोबारा केला ही घटना घडताच हे पोलीस नसून लुटारु असल्याचे लक्षात येताच कौतिक खाकरे यांनी दोन किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला परंतु त्यांच्या जवळ पल्सर गाडी असल्यामुळे ते शेंदुर्लीकडे पळून जाण्यात यशस्वी झाले.
या अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे कौतिक खाकरे भांबावून गेले दुचाकीवरुन आलेले तरुण निघुन गेल्यावर त्यांनी आपल्या थैलीतील पैसे पाहिले असता त्यांनी काढलेल्या एक लाख नव्वद हजार पैकी एक लाख रुपये घेऊन तोतया पोलीसांनी पोबारा केल्याचे लक्षात आले. आपले एक लाख रुपये पोलीसांनी नव्हे तर पोलीस असल्याचा बनाव करत तोतया पोलीसांनी लुटल्याची खात्री झाल्यावर त्यांनी लगेचच शेंदुर्णी येथील पोलीस चौकीत येऊन घडलेला प्रकार सांगितला. शेंदूर्णी येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक मा. श्री. दिलीप पाटील यांनी कौतिक खाकरे यांच्याकडून घडलेली घटना ऐकुन घेत तशी नोंद करुन कौतिक खाकरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एक लाख रुपये घेऊन पोबारा केलेल्या तोतया पोलीसांचा म्हणजे लुटारुंचा शोध घेत आहेत.
पाळत ठेवून लुटमारीचा संशय
कौतिक खाकरे यांनी बॅंकेतून पैसे काढल्यापासून तर शेंदुर्णी येथून दुचाकीवरुन गोंदेगाव गावाकाडे जाईपर्यंत चोरट्यांनी काटेकोरपणे पाळत ठेवून कौतिक खाकरे यांना रस्त्यावर अडवून लुट झाल्याचे खात्रीलायक वृत्त असून पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी बँकेतील व बँकेच्या जवळीली तसेच बँकेपासून तर शेंदुर्णी शहराचे बाहेर निघेपर्यंत रस्त्यावर उपलब्ध असलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन तपास करणे तसेच कौतिक खाकरे यांच्याकडून लुटारुंचे वर्णन जाणून घेत जमल्यास स्केच तयार करुन किंवा घटना घडली तेव्हा या परिसरातील भ्रमणध्वनीचे रेकॉर्ड काढून तपास केल्यास नक्कीच चोरटे सापडू शकतातील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे
शेंदूर्णी गावात बऱ्याचशा गोष्टी अश्या आहेत की त्या कायदा सुव्यवस्था व समाजव्यवस्था बिघडवण्यासाठी कारणीभूत आहेत. यातुनच शेंदुर्णी गावात दिवसेंदिवस अशांतता व समाजमन दुषित करतील अश्या घटना घडत आहेत. मात्र समाजव्यवस्था व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या घातक गोष्टींचा विरोध करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेंदुर्णी गावचे वातावरण दिवसेंदिवस गुन्हेगारांसाठी पोषक ठरत आहे.