हटकर धनगर समाजाचे समाजसेवक अभिलाल दादा देवरे यांना यंदाचा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार तसेच अण्णासाहेब खेमनार यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य युवा शक्ती अहिल्या सेनेच्या वतीने समाज कार्य करणाऱ्या समाज सेवकांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. युवा शक्ती अहिल्या सेनेचे अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी समाजात प्रामाणिक काम करणारे समाज रत्नांची निवड केली आहे. त्यात राज्यस्तरीय समाज रत्न, अहिल्या कन्या रत्न, आदर्श मातापिता रत्न असे पुरस्कार देण्यात आले आहेत. या पुरस्काराचे मानकरी समाजसेवक अभिलाल दादा देवरे व अण्णासाहेब खेमनार तसेच महाराष्ट्रातील धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक, चाळीसगाव, संभाजीनगर, इंदौर, हिंगोली, जालना, श्रीरामपूर एम.पी असे अनेक जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते, या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली आहे असे समाजसेवकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे, अभिलाल दादा देवरे यांनी गेल्या तीन वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रात समाज व बहुजनांचे मोफत आरोग्यावर संपूर्ण ग्रामीण भागात हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो लोकांचे ईसीजी, अँजिओग्राफी, एन्जोप्लास्टी सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून गव्हर्मेंटच्या रोलनुसार गावागावात जाऊन मोफत करून घेतले, तसेच मुतखडा, पीतखडा, बायपास, यासारखे शेकडो लोकांचे ऑपरेशन मोफत करून घेतले, तसेच सरकारी हॉस्पिटलच्या माध्यमातून माता-भगिनींना डिलिव्हरी साठी वेळोवेळी सहकार्य केले, एनटीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2017 ते 22 पर्यंत थकीत असलेली शिष्यवृत्ती समाज कल्याण व कलेक्टर ऑफिस तसेच मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून प्राप्त करून घेतली, नोकर वर्गांसाठी विभागीय कार्यालयापासून तर मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून जुनी पेन्शनसाठी पाठिंबा दिला, सांजोरी फाटा ते उडाणे फाटा सर्विस रोड साठी वेळोवेळी पाठवा करून सर्विस रोड मंजूर करून घेतला, चिंचवार गावातील आरोग्य उपकेंद्रासाठी तीन पदे मंजुरी करून उपकेंद्र चालू होण्यासाठी आरोग्य खाताकडून तसेच मंत्रालयात पाठपुरावा चालू आहे, अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी लाईट रस्ता व बी बियाणे योग्य दरात मिळावे तसेच अति दृष्टीमध्ये आर्थिक मदत मिळावी यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला, अशाप्रकारे अनेक क्षेत्रात समाज हिताचे लिखाण करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात वाचा फोडण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. अभिलाल दादा देवरे सांगतात असे सर्व समाजसेवेचे काम करण्यासाठी कविताताई अभिलाल देवरे यांनी सतत पाठबळ दिले, म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे त्यामुळे समाज रत्न व समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात रविवार २८ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने या कार्यक्रमात पुरस्कार देऊन समाज सेवकांचा गौरव करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजसेवेचे काम करणारे तसेच समाजसेवकाला मार्गदर्शन करणारे जगन दादा मासुळे, सुभाष मासुळे सर, गुलाब ठोंबरे सर, मच्छिंद्र बिडगर नाशिक, माजी सभापती विजय पाटील सर अशोक दादा आजगे, छोटू भाऊ थोरात, आप्पा खताळ, प्रकाश आप्पा, पप्पू भाऊ थोरात, नामदेव भाऊ चोपडे, संदीप गवळी, वंदनाताई थोरात नगरसेविका, सुनीताताई धनगर, चंद्रकलाताई मासुळे, योगिताताई पाटील, मयूरीताई खेमनार, कविताताई देवरे, रेखाताई धनगर चाळीसगाव, लज्जाताई धनगर इंदौर, प्रतिभाताई धनगर नंदुरबार, निर्मलाताई बाांडे जिंतूर, सरला वाघमोडे साक्री, संगीताताई पाटील जळगाव, बाळूूभाऊ मस्के हिंगोली, सुनील धनगर, लक्ष्मण डोने चोंडी सरपंच, शेखर डोमाळे पीएसआय पारोळा, शाहीर माडके जालना, मुकेश धनगर एम.पी, धनंजय माने श्रीरामपूर, संदीप कापडणे नाशिक, विनोद धनगर शिरपूर, रमेश धनगर इंदौर, धनंजय रुपनर एम.पी, समाधान धनगर पारोळा, दिगंबर खंडागळे वैजापूर, सुनील धनगर दोंडाईचा क्षणाभाऊ धनगर चिमठाणे दामू थोरात लखमापूर, सतीश उघडे, भीमराव गडरी नवापूर, रामनाथ मंडलिक संभाजीनगर, धनंजय माने श्रीरामपूर राजेंद्र हाके सर, सुनील धनगर तराडी, सर्व समाज बांधव ज्येष्ठ श्रेष्ठ माता-भगिनी तरुण मित्र उपस्थित होते. तसेच कविताताई अभिलाल देवरे यांना 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान महाराष्ट्र शासन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपस्थित सर्व समाज बांधवांनी वरील पुरस्कार प्राप्त बंधू-भगिनींचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.