पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर काल त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. आणि विजय बलकी , प्रेमानंद जोगी अन्नत्याग आंदोलनाला बसले त्यानंतर झालेल्या ओबीसी महासंघाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता.
आज जनता कॉलेज नागपुर महामार्गावर स्थानीय जनता काॅलेज चौकामधे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विधानपरिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर सहीत सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमापत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्य़ात वस्तीगृह या मागण्यांसह सुरु झालेले आंदोलन आता आणखी तीव्र होत चालले आहे. ओबीसी कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयात प्रतिबद्द केले या वेळी
बबनराव फंड,दिनेश चोखारे,नंदू नागरकर,अनिल धानोरकर,रवींद्र शिंदे,सतीश भिवगडे, राजेश नायडू,पप्पू देशमुख,कुणाल चहारे, महेश खंघार,अनिल शिंदे, निलेश बेलखेडे,रोशन पचारे, हितेश लोडे, गणेश आवारी ,पांडुरंग टोंगे, विकास विरुतकर मनीष बोबडे,गोमती पाचभाई,मायताई ठावरी,कुसुम उदार,गणेश आवळे,श्याम लेडे, गणेश झाडे,योगेश बोबडे, अक्षय येरगुडे,विनोद निब्राड,बाळा पिंपळशेंडे,अशोक उपरे,भाऊराव झाडे,भाविक येरगुडे,राहुल भोयर सहीत अनेक ओबीसी कार्यकर्ते सामील झाले.