पो.डा. जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र मशारकर , चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, याविरोधात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी, दुसऱ्या दिवशीही त्यांचे आंदोलन कायम होते. दिवसभरात ओबीसी समाजबांधवांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष (वैद्यकीय आघाडी) डॉ. संजय घाटे टोंगे यांची भेट घेतली. टोगे यांच्या वेंडली या मूळ गावातील सुमारे ८० महिलांसह शेकडो गावकरी हेदेखील उपोषणात सहभागी झाले होते. दिवसभरात आंदोलनात सहभाग नोंदविणाऱ्यांमध्ये डॉ. संजय घाटे, अॅड. अविनाश टावरी, अॅड. संजय मुनघाटे, शुभांगी भिवगडे, डॉ. दिलीप कांबळे, कांता पोडे, श्याम बोबडे, विजय पिदूरकर, किशोर टोंगे, गोविंदा पोडे, नितीन गोहने, रंजित डवरे, रंजित पिंपळशेंडे, प्रकाश चालूरकर, नंदकिशोर टोंगे आदींचा समावेश आहे. दरम्यान, टोंगे यांच्या आंदोलनाला मंगळवारी अखिल भारतीय ओबीसी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर चौधरी, संघटक दौलतराव समर्थ, गंगाधर आकडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समर्थन जाहीर केले.