पो.डा. वार्ताहर , वाशिम : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता समारंभाला आजपासून सुरुवात झाली. सांगता समारंभाच्या निमित्ताने ” मेरी माटी मेरा देश ” हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, नितीन चव्हाण,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार राहुल वानखेडे व लेखाधिकारी युसुफ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंचप्रण शपथ वाचन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.शपथ वाचन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.