पो.डा. वार्ताहर , वाशिम : जिल्हयातील प्रवासी बस वाहन चालक व जड वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने मोफत नेत्र तपासणी व नंबरचे चष्मे देण्याचे तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व वाहन चालकांनी नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. वाहन चालकांनी स्वत:चे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स स्वत:जवळ ठेवावे.
वाशिम तालुका – 10 व 11 ऑगस्ट 2023 रोजी नेत्र रुग्ण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत. मंगरुळपीर तालुका – 25 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय, मंगरुळपीर येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत. मालेगांव तालुका – 22 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय मालेगांव येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. कारंजा तालुका – 23 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय, कारंजा येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि रिसोड तालुक्यात 24 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.