पो.डा. वार्ताहर:
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे . अशी प्रश्नावली राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डल वरून दिली आहे