पो.डा.वार्ताहर , परभणी : जिल्ह्यात महसूल व वन विभागामार्फत आजपासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, शनिवारी सकाळी ११ वाजता ‘सैनिक हो, तुमच्यासाठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात शहिदांच्या वीर पत्नी, वीर माता-पिता यांचा सत्कार करणे, आजी-माजी सैनिकांच्या महसूल संदर्भातील अडीअडचणींचा निपटारा करणे प्रस्तावित आहे. तरी सर्व वीर पत्नी, वीर माता-पिता तसेच माजी सैनिक-माजी सैनिक विधवा पत्नी यांनी शनिवारी जिल्हा नियोजन सभागृह, परभणी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दत्तु शेवाळे यांनी केले आहे.