पो.डा.वार्ताहर ,जळगाव : जिल्ह्यातील खासगी बस चालक, अवजड वाहन चालक, एसटी बसचालक, शासकीय वाहन चालक, ऑटोरिक्षा टैक्सी संघटना, मोटार ड्रायविंग स्कूल प्रशिक्षक व चालक यांच्यासाठी ३ ऑगस्ट पासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ता सुरक्षा सभागृहात नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
स्कूलबस चालकांनी दिनांक ५ ऑगस्ट, ऑटोरिक्षा/ टॅक्सी/ ट्रक/ खासगी बसचालक – ८ ऑगस्ट, परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्याकरीता येणारे वाहनचालक – १० ऑगस्ट, स्कूलबस चालक – १२ ऑगस्ट, परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्याकरीता येणारे वाहनचालक- १७ ऑगस्ट, ऑटोरिक्षा/ टॅक्सी/ ट्रक/ खाजगी बसचालक – १९ ऑगस्ट, मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षक व चालक- २२ ऑगस्ट, परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्याकरीता येणारे वाहनचालक – २४ ऑगस्ट, शासकीय वाहनांचे चालक – २६ ऑगस्ट, परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती नुतनीकरण करण्याकरीता येणारे वाहनचालक – ३१ ऑगस्ट या तारखेला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ ते ५ वाजेच्या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
शिबीराचा लाभ घेण्यासाठी वाहनचालकांनी यांनी स्वत:चे आधार कार्ड व परिवहन संवर्गातील (Transport) लायसन्स आणणे बंधनकारक आहे. असे ही श्री.लोही यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.