पो.डा. वार्ताहर : पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते आज Pune Metro Rail Project च्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटनदेखील यावेळी झाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डुडुळगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ११९० सदनिका बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पेठ क्र.१२ टप्पा-२ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ६४५२ घरकुलांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेमार्फत वडगाव, खराडी आणि हडपसर येथे बांधण्यात आलेल्या २६५८ घरकुलांचे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या १२८८ सदनिकांच्या चाव्या प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आल्या.
या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.