पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : ज्येष्ठ साहित्यिक, सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अस्वस्थ झाले. प्राचार्य धनकर यांचे केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये प्राबल्य होते. इतकेच नव्हे तर त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून आपला ठसा देखील उठवला होता. म्हणूनच ते चंद्रपूरच्या साहित्य क्षेत्रातील भाषाप्रभू होते, अशा शोकभावना वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केल्यात.
त्यांच्या निधनाने चंद्रपूरच्या सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्राचा आधारवड, चंद्रपूरभूषण हिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
प्राचार्य मदन धनकर यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून आणि कर्तृत्वातून आयुष्यभर माणसं जोडली. हरिवंशच्या माध्यमातून अनेक नवोदित आणि प्रतिभावंत साहित्यिकांना साहित्य क्षेत्रात संधी निर्माण करून दिली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नेत्यांसाठी ते मार्गदर्शक होते, असेही आमदार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.