पो.डा. वार्ताहर , पुणे : पुणे शहरातील मेट्रोसह विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी प्रधानमंत्री Narendra Modi यांचे सिंचननगर हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
तत्पूर्वी, लोहगाव विमानतळ येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.