पो.डा. वार्ताहर : जयपूर- मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवासी आहेत. आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलने सगळ्यांवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवली, मीरा रोड स्थानकादरम्यान घडली. मीरा रोड बोरिवली दरम्यान मुंबईच्या जवानांनी या कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले.
जयपूर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक १२९५६) कोच क्रमांक बी ५ मध्ये ही घटना घडली. ही घटना आज पहाटे ५.२३ वाजता घडली. आरपीएफ जवान आणि एएसआय दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, कॉन्स्टेबल चेतनने एएसआयवर अचानक गोळीबार केल्याने प्रवासी प्रवाशांमध्ये गोंधळ पसरला.