महात्मा गांधी हे महानायक आहेत, त्यांचा अपमान सहन करणार नाही: ना. देवेंद्र फडणविस
पोलीस डायरी वार्ताहर: महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्या अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३० ) माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभर पडसाद उमटत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी भिडे गुरुजींच्या विरोधात तक्रारी देखील दाखल करण्यात येत आहेत
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे.’ भिडे गुरुजी आणि इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य करु नये. महात्मा गांधी असाेत की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन होणार नाहीत. या संदर्भात उचित कारवाई करण्यात येईल.