पो. डा. वार्ताहर , बुलढाणा : सत्काराच्या वेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले की धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या भूमिकेमुळे तसेच मार्गदर्शनामुळे आमच्या मागण्या नक्कीच मान्य होतील तसेच आम्हाला नक्की न्याय मिळेल असा आम्हा सर्वांना सार्थ विश्वास आहे…!
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ द्या तसेच ज्या कर्मचाऱ्यांची सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे त्यांना सेवेत कायम करण्यात बाबत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मागणी केली होती…!
त्यानिमित्ताने आज दिनांक- २९ जुलै २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा त्यांच्या मातोश्री शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला..!
पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानसभा सभागृहांमध्ये जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन विभाग अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची विधानसभेत धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी बाजू मांडली, हे सर्व कंत्राटी कर्मचारी सुमारे १५ ते २० वर्षापासून अत्यल्प मानधनावर काम करत आहेत, त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा नसतात व त्यांना कुठलीही कामाची सुरक्षितता व शाश्वती नसते त्यामुळे बहुतांशी जणांचे स्पर्धा परीक्षांचे वय आता निघून गेलेली आहे या सर्वांचा उमेदीच्या काळ हे अभियान यशस्वी करण्यासाठी केला आहे, याचे फलित म्हणून बरेच स्पर्धांमध्ये अभियानामध्ये उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य देशाचा अग्रस्थानी राहिलेली आहे परंतु या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची भविष्याची सुरक्षितता नाही या सगळ्या समस्या कंत्राटी कर्मचारी यांनी आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्याकडे मांडल्या होत्या, त्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे, तसेच यावेळी बोलताना धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले लवकरच या मागण्या मान्य करून घेऊ….!
यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते…!