पो. डा. वार्ताहर , वाशिम: मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने मासेमारी संकट निवारण निधीअंतर्गत मानोरा तालुक्यातील रुई(गोस्ता) येथील श्री.वाघामाय देवी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद स्व.महादेव चवरे यांच्या वारसदार श्रीमती अनिता चवरे यांना २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते १ लक्ष रुपये धनादेशाचे वितरण करण्यात आले.यावेळी मत्स्यव्यवसायचे सहायक आयुक्त मनोज जयस्वाल आणि सहायक मत्स्यव्यवसाय अधिकारी ए.व्ही.जाधव यांची उपस्थिती होती.