पो. डा. प्रतिनिधी, पुणे,
आळंदी,17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करत तिला गर्भवती केल्या प्रकरणी तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा जानेवारी – फेब्रुवारी 2023 दरम्यान आळंदी येथे घडला होता.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अमित अंकुश इंगोले (वय 21 रा. दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी 17 वर्षाची आहे हे माहिती असून देखील आरोपीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले, परिणामी फिर्यादी यांची मुलगी 4 महिन्यांची गर्भवती राहिली आहे. यावरून दिघी पोलीसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर बाललैंगिक आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस स्टेशन येथील पोलिसांद्वारे सुरू आहे.