साक्षीदरम्यान आरोपीचे वकिल व उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी
पो. डा. राजन चौक, जिल्हा प्रतिनिधी,धुळे
सनी साळवे खून खटला निर्णायक टप्प्यावर आलेला असून तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांची आरोपी नंबर ३ च्या वकिलांनी उलटतपासणी घेतली.
उलटतपासणीचे कामकाज सुरू असतांना आरोपीचे वकील व साक्षीदार यांच्यात वाद झाला. आरोपीच्या वकिलांची उलटतपासणी घेत असतांना वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांची साक्षीदार यांनी प्रत्यक्षदर्शी घडलेल्या घटनांची क्रमवारीत उत्तरे दिलीत. सिद्धेश्वर हॉस्पिटल, घटनास्थळी पंचनामा, साक्षीदारांचे जबाब,आदी संदर्भात प्रश्न विचारलेत. पुढील कामकाज दि. २८जुलै रोजी होणार आहे.
सदर खून खटला न्यायाधीश एम.जी.चव्हाण यांची बदली झाल्याने सदर खटल्याचे कामकाज न्या.डी.एम.आहेर यांचे समक्ष सुरू आहे.
देवपूरातील सशस्त्र हल्ल्यातून खून झालेल्या सनी साळवे खून प्रकरणी न्यायालयात तपास अधिकारी तत्कालिन उपअधीक्षक सचिन हिरे यांची उलटतपासणी पूर्ण झाली आहे.
चंदन नगरातील सनी साळवे याचा १८ एप्रिल २०१८ मध्ये खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात कामकाज सुरू आहे. सदर खून खटल्यातील काही आरोपी हे तुरुंगात आहेत. याकामी विशेष सरकारी वकील शामकांत पाटील हे काम पहात असून ॲड.विशाल साळवे त्यांना मदत करत आहेत. सदर खून खटलाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.