महिलांवर होणारे वारंवार अत्याचार मी कदापि सहन करणार नाही, —धर्मवीर आमदार संजय गायकवाड
महिलांवर अत्याचार करणारे आरोपी जर कायद्याच्या कचाट्यातून सुटले तर माझ्या कचाट्यातून ते कदापी सुटणार नाही—–
धर्मवीर आमदार संजय गायकवाड
पो. डा. वार्ताहर : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील राजुर घाट येथे 7 ते 8 वासनांध टोळक्यांनी राजुर घाट येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला ते सेल्फी घेत असताना त्यांना त्याठिकाणी अडवून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच त्यातील 4 ते 5 जणांनी त्यातील व्यक्तीच्या गळ्याला चाकू लावून 7 ते 8 वासनांध तरुणांनी महिलेवर बलात्कार केला, या घटनेची माहिती तात्काळ धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांना कळताच त्यांनी माननीय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या कानावर टाकली, त्यानंतर माहिती कळताच भाऊंनी ताबडतोब सदर पीडित महिलेच्या नातेवाईकांना घेऊन बोराखेडी पोलीस स्टेशन गाठले..!
*जोपर्यंत अज्ञात नराधमांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले नव्हते तोपर्यंत धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड बोराखेडी पोलीस स्टेशन येथे ठाण मांडून बसले होते, तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई व्हावी यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दम दिला, यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव शिवसैनिक युवासैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते….!