आज आपण पोटांच्या विविध समस्येवर काही निवडक व त्वरीत गुणकारी असे १००% फक्त घरगुती उपाय बद्दल माहिती जाणुन घ्या व त्याचा उपयोग करून निरोगी रहा.
🟢 अजिर्ण – अपचन
(१) आल्याचे लहान तुकडे करून ते त्यावर प्रथम लिंबु चे ८/१० थेंब टाकावे व नंतर सैधव मिठ चवीपुरते टाकुन ते चघळावे.
(२) लिंबु अर्धे कापुन त्याच्या दोन्ही फोडीवर सैधव मिठ टाकावे, नंतर त्या लिंबाच्या फोडी तव्यावर हलक्या स्वरूपात गरम करून मग ती चाखावी.
(३) गाईच्या दुधापासुन बनलेल्या ताकात जीरे व काळेमिरीपुड टाकुन त्यावर चवीपुरते मिठ टाकुन प्यावे.
(४) तुळशीच्या पानांचा रस एक चमचा प्यावा.
🟢 अतिसार – जुलाब
(१) एक ग्लास ताकात २ चमचे मध टाकुन प्यावे.
(२) पिकलेली केळी ताकात मळुन २ वेळेस घ्यावे.
(३) गाईच्या दुधापासुन बनलेल्या ताकात १ किंवा २ ग्रॅम एवढेच तुरटीची पावडर ( भस्म ) टाकुन २ वेळेस प्यावे. ( रक्ताचे जुलाब थांबतात )
(४) दह्यामध्ये एक केळे व केसर एकत्र करून ते घेतल्यास त्वरीत आराम मिळतो. ( संग्रहिणी तसेच अतिजुलाबास उपयुक्त )
(५) गाईच्या १ चमचे तुपात २ चमचे मध टाकुन घ्यावे.
🟢 पित्त – ॲसिडीटी
(१) आवळ्याच्या रसात मध टाकुन घ्यावे.
(२) १ ग्लास गाईचे दुध हळुहळु १-१ घोट पिल्यास आराम होतो. २ वेळेस.
(३) २ चमचा लिंबाचा रस + भाजलेले झीरे अर्धा चमचा + मध घेतल्यास आराम होतो.
🟢 अल्सर
(१) ओव्याची बारीक पावडर करून मधासोबत घ्यावी. १ चमचा.
(२) एक ग्लासभर पाण्यात २ चमचे मध टाकुन नियमित घ्यावे.
(३) मुळ्याच्या वरचा थर किसुन त्यात लिंबु टाकुन घ्यावे.
आपले पोट हे अनेक विकारांचे उगमस्थान आहे तसेच ते अनेक प्रकारचे विकार हे पुर्णता मिटवु शकते, वरील काही प्रभावी उपाय सुचवले आहेत. वीनाखर्चाचे पण त्वरीत लाभदायक आहेत.