पो. डा. वार्ताहर : समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अन्य ८ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी भेट दिल्यानंतर या अपघाताची भीषणता किती असेल याचा अंदाज आला. तसेच यापुढे समृद्धी महामार्गावर असे अपघात घडू नयेत यासाठी होणाऱ्या अपघातांचा तज्ञांकडून सखोल अभ्यास करून भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रतापराव जाधव, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार श्वेता महाले, आमदार संजय रायमूलकर तसेच एमएसआरडिसी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.