सत्कार समारंभ,स्मरणिका प्रकाशन आणि वकीली या विषयावर चर्चासत्राचे दि,.२८जुलै रोजी कल्याण येथे आयोजन
पो. डा. वार्ताहर कल्याण :
संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दि.५ जुलै १९२३ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात वकीली करण्यास परवानगी मिळाली होती.
डॉ.बाबासाहेबांच्या वकिलीला दि.५ जुलै २०२३ रोजी शताब्दी पूर्ण होत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडवोकेट्स अँड असोसिएशन्स दिल्ली, आयोजित महाराष्ट्रातील १०१ सन्माननिय वकील बंधू-भगिनींचा सत्कार समारंभाचा स्मरणिका प्रकाशन आणि वकीली या विषयावर चर्चासत्राचे आयोजन”आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण-पश्चिम ” येथे दि.२८ जुलै २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून संध्या. ७:०० वाजेपर्यंत केले आहे.
स्मरणिकेसाठी महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की,
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली विषयी स्व-लिखीत लेख,कविता (१००० शब्द मर्यादा )
२) नवोदित वकिलंच्या समस्या-उपाय योजना
३) वकील संरक्षण कायदा-काळाची गरज
या विषयावर लेख
दि.१० जुलै पर्यंत ८०९७२३६२९८ या व्हाट्सअप नंबर वर pdf फॉर्मेटमध्ये पाठवावेत.तसेच या स्मरणिकेसाठी ज्यांना जाहिरात द्यायची आहे त्यांनी वरील मोबाईल नंबर वर १० जुलै पर्यंत आयोजक ॲड.रवी प्रकाश जाधव अध्यक्ष ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडवोकेट्स अँड असोसिएशन,ॲड.प्रकाश रा. जगताप,वरिष्ठ उपाध्यक्ष ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडवोकेट्स अँड असोसिएशन,अध्यक्ष
कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना कल्याण यांनी आवाहन केले आहे.