छत्रपतींचा पुतळा कोसळणे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अवमान
भ्रष्टाचारी खोके सरकारचा जाहीर निषेध
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने महायुतीचा भ्रष्टाचारी कोथळा बाहेर पडला आहे.
400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही. पण ८ महिन्यांपूर्वी बांधलेला पुतळा कोसळला. याचा अर्थ महायुतीचे हे सरकार 4 डिसेंबर २०२४पूर्वी सत्तेतून नक्कीच कोसळेल, त्याचेच हे संकेत आहेत. या भ्रष्टाचारी खोके सरकारचा जाहीर निषेध चंद्रपूरच्या मनसेच्या जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
#शिवराय #शिवाजीमहाराज