पो. डा. वार्ताहर , वढोली: आज पासून जिल्हा परिषद शाळेची घंटा वाजली असून नवागत विध्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रम गोंडपिपरी तालुक्यात सर्व शाळेत उत्साहात पार पडले.
शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी.हा उदात्त हेतू ठेऊन सामाजिक भावनेतून वढोली जी प शाळेत शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या पुढाकारातून
नोट बुक वितरित करण्यात आले.यावेळी मित्रपरिवार व बाजारसमिती संचालक संदीप पौरकार,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रुपेश कोहपरे,रुचीगंगा संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के, गोकुल सोनटक्के,उमेश उपासे,निखिल आत्राम,सुरज शेंडे,महेश झाडे,सुरज भोयर उपस्थित होते