महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा मंत्रालयात महिलांच्या वस्तूचे प्रदर्शन
पोलीस डायरी प्रतिनिधी, मुंबई, :महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने राज्यातील महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.