आरसेटीमध्ये सोराबजी पोचखानवाला जयंती साजरी
पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संस्थापक सर सोराबजी पोचखानवाला यांची १४३वी जयंती सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत साजरी करण्यात आली.
संचालक संदीप पोटे यांनी बँकेच्या स्थापनेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. स्वदेशी चळवळ आणि राष्ट्र उभारणीसाठी बँकेची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर सोराबजींनी महिला शाखा, गृह बचत खाते, क्रेडिट कार्ड आदी सेवा सुरू केल्या असल्याचे सांगितले. यावेळी सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.