पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा व त्यांच्या आर्थिक स्वालंबनासाठी महिलेच्या श्रमसहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांचा आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या वतीने “मुख्यमंत्री माझी लाडकी-बहीण” सुरुवात करण्यात आलेली आहे. करीता सदर योजनेचा लाभ चंद्रपूर महानगरात महिलांना मिळण्याकरीता ठिक-ठिकाणी योजनेच्या संदर्भात बॅनर, पोस्टर व सेतु सुविधा केंद्र लावण्यात यावे, तसेच योजनेच्या संदर्भात लागणारे कागदपत्रे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे. याकरिता स्वतंत्र्य यंत्रणा तयार करण्यात यावी. योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्यात यावी. करीता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चंद्रपूर महानगराच्या वतीने आज चंद्रपूर शहर महागनपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळेस महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे, महामंत्री शिला चव्हाण, सुषमा नागोसे, कल्पना बगुलकर, उपाध्यक्ष शितल गुरुनुले, चंद्रकला सोयाम, माया उईके, आत्मनिर्भरच्या अध्यक्षा मोनिषा महातव, बेटी बचाव-बेटी पढाव रेणुका घोडेस्वार, सचिव सुनिता जयस्वाल, सारिका संदुरकर, संगिता बावणे यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती.