पो. डा. वार्ताहर मुल : चंद्रपूर जिल्ह्याच्या विशेषत: मुलच्या विकासात अडसर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आपण हे सर्व प्रयत्न हाणुन पाडले आहे. सत्तेत असो अथवा नसो मुलचा विकास करून त्याला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुल येथील सुभाष प्राथमिक शाळेसमोरील भव्य प्रांगणावर आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते अविनाश जगताप,भाजपा महामंत्री नामदेव डाहुले,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,अमोल चुदरी, गजानन वलकेवार,लोकनाथ नर्मलवार,प्रशांत बोबाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मुलमध्ये व्यापक प्रमाणावर परिवर्तन होत आहे. मध्यंतरीच्या काळात सत्ता नसल्याने सर्व विकास कामे थांबविण्याचा प्रयत्न विरोधकांनी करून पाहिला. परंतु सत्ता नसतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी आपण घेतलेल्या आक्रमक पवित्र्यापुढे विरोधकांचे काहीही चालले नाही. दोन वर्षाच्या काळात अनेक कामे बंद पाडण्याचा सपाटा लावण्यात आला होता. मात्र आता जनेतेचे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळे मुल तालुक्याला देशातील सर्वोत्तम तालुका करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
देशात काही पक्ष जातीधर्माच्या नावावर विष पेरण्याचे काम करीत आहेत. हिंदू-मुस्लिम असा भेद करू पहात आहेत. अफजल खानला एका विशिष्ट धर्माचा असल्यामुळे कुणाचाही विरोध नसून त्या प्रवृत्तीला विरोध आहे. देशात विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण करण्याचे काम करीत आहेत. मात्र काही शक्ती आणि काँग्रेस पक्षाकडून मोदीजी यांचा विरोध सातत्याने करीत आहेत. अशा शक्तींना आणि पक्षांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.
सैनिकी शाळा, मूलचे बस स्थानक, एसएनडीटी विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, बांबू प्रशिक्षण केंद्र, सार्वजनिक वाचनालय अशा विविध माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख बदलत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात चंद्रपूर जिल्ह्याचे नाव पोहोचले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराला व नव्या संसद भवनाला लावण्यात आलेले काष्ठ चंद्रपुरातील असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की विकासाचा हाच धडाका कायम ठेवायचा आहे. सर्वांची साथ असली तर विकास अधिक वेगाने शक्य होईल असे ना.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
यावेळी, कार्यक्रमाला संजय येनगंट्टीवार,कवडू कोल्हे,संजय भास्करवार,विपीन भालेराव,अविनाश वरगंटीवार,सतीश आक्कूलवार,गुरु भंडारे,आकाश मारकवार,जितू टिंगूसाठे,आकाश कोल्हे उपास्थित पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.