पो. डा. वार्ताहर , नागपूर : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने वीस टक्के जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत 2023-24 या वित्तीय वर्षात मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला, शेतकरी व बेरोजगारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा अनुसूचित जाती, नवबौध्द, अनुसूचित जमाती, विजाभज या प्रवर्गातील गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी केले आहे.
मागासवर्गीय शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना सायकल पुरविणे, मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युत मोटर पंप पुरविणे, मागासवर्गीय बेरोजगारांना मंडप डेकोरेशन पुरविणे आदी योजना राबविण्यात येत आहेत. योजनेसाठी अर्जदार हा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असावा.