पो.डा. वार्ताहर, पंढरपूर :
मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश.
मनसेच्या मागणीला यश
पंढरपूर शहरातील नगरपालिकेचा बंद अवस्थेत असलेला दवाखाना पुन्हा सुरु करण्यात यावा आणि पंढरपूर शहरातील गेले कित्येक वर्ष हाताने विस्टा उचलून पंढरपूर शहर स्वच्छ ठेवणाऱ्या मेहतर समाजाला हक्काची घरे मिळावीत महाराष्ट्र यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन हे दोन्ही प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी केली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नगरपालिकेचा बंद पडलेला दवाखाना त्वरित सुरु करण्यास दर्भात नगर विकास सचिव यांना आदेश दिले तसेच मेहतर समाजाच्या गृहप्रकल्पास खास बाब म्हणून मान्यता देण्यासाठी प्रधान सचिव यांना आदेश दिले.
पंढरपूर शहराची लोकसंख्या जवळ जवळ दोन लाखाच्या आसपास असून संपूर्ण देशातून एक लाख भाविक रोज श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी येत असतात, गेल्या तीन वर्षांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेचा दवाखाना बंद आहे.पूर्वी हा दवाखाना सुरु असताना पंढरपूर शहरातील आजारी पडणाऱ्या व शहरात येणारे जे भाविक आजारी पडत होते त्यांच्यावर उपचार केले जात होते. गेल्या तीन वर्षापासून हा दवाखाना बंद पडल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत असून पंढरपूर शहरामध्ये एक शासकीय रुग्णालय आहे, या शासकीय रुग्णालयामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो नागरिक त्या ठिकाणी रोज उपचारासाठी येत असून त्यामुळे तेथे रुग्णांची प्रचंड गर्दी होत असते या होणाऱ्या गर्दीमुळे उपजिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण पडत असून त्या ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे.
यामुळे नगरपालिकेने बंद केलेला दवाखाना त्वरित सुरु करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी चर्चा करून दवाखाना सुरू करण्याची मागणी केली.
हा दवाखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याचे सचिव यांना लेखी आदेश दिले आहेत.
तसेच गेले 136 वर्षे झाले पंढरपूर शहरातील मेहतर समाज पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असून सर्व यात्रांच्या कालावधीमध्ये हा मेहतर समाज पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आला आहे.
परंतु अद्याप पर्यंत त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली नाहीत यामुळे या कुटुंबाची हेळसांड होत आहे. या विषयासंदर्भात मेहतर समाजांच्या गृह प्रकल्पासाठी खास बाब म्हणून त्वरित मान्यता देऊन या गरीब अशा मेहतर समाजाला न्याय द्यावा ही मागणी मुख्यमंत्री एखानाथ शिंदे यांच्याकडे बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे यांनी केली यावेळी मुख्यमंत्री यांनी प्रधान सचिव यांना मेहतर समाजातील या कुटुंबाच्या गृहप्रकल्प पास खास बाब म्हणून मान्यता देण्यासाठी लेखी आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.