योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. योगामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होत असून योग हे एकप्रकारे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनशैलीसाठी रोज योगा करून निरोगी राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
#आंतरराष्ट्रीययोगदिन च्या सर्वांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात योग पोहोचविला, त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात मांडला होता. योगाचे महत्व ओळखून संयुक्त राष्ट्र संघानेही (युनो) मान्यता दिल्याने जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री मोदी हे सध्या न्यूयार्कमध्ये योगा करीत आहेत, ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात एकाचवेळी ३५ लाख नागरिक, अधिकारी, कर्मचारी योगा करीत आहेत. ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे. योगा ही आता काळाची, समाजाची चळवळ होत आहे. आपला देश जगाला नवनवीन कार्यक्रम देत असून #G20Summit ची या वर्षाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम’ असून संपूर्ण देश हा आपला परिवार आहे, असे प्रधानमंत्री मानतात, याचाही आपल्याला अभिमान असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्या साधकांनी योग प्रात्यक्षिके करून दाखविली.