स्वीप समितीच्या मोबाईलला डीपी ,स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
पो.डा. वार्ताहर , अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर – शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी) यांच्या संकल्पनेतून मोबाईलला डीपी , स्टेटस व रिंगटोन लावण्याच्या डीपी बोले तो.. डेमोक्रेसी पार्टिसिपेशन
या उपक्रमाचे विमोचन जिल्हा आढावा बैठकीत श्री सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आशिष येरेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी जि प ), डॉ. पंकज जावळे ( आयुक्त अहमदनगर मनपा ), भास्कर पाटील (शिक्षणाधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते
मोबाईलचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जातो. डीपी ठेवणे ,स्टेटस बदलणे व विविध रिंगटोन लावणे या सामान्य माणसाच्या आवडत्या सवयी आहेत.या गोष्टीची औचित्य साधूनडीपी बोले तो.. डेमोक्रेसी पार्टिसिपेशन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रिंगटोन व कॉलर ट्यून लावण्यासाठी भारत निवडणूक आयोग यांचे ” हम भारत के मतदाता है ” व मुख्य निवडणूक अधिकारी – महाराष्ट्र यांचे ” ये पुढे ,मतदान कर ,लोकशाहीचा सन्मान कर ” ही दोन गीते क्यूआर कोड , लिंक , व ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात अहमदनगरकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर डीपी व स्टेटस ठेवण्यासाठी ” मी भारत आहे मी महाराष्ट्र आहे मी अहमदनगर आहे व मी मला मतदान करणार ” अशा आशयाचे डिझाइन्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.ज्यांना डीपी , स्टेटस व गाणे हवे आहे त्यांनी देशातल्या पहिल्या अहमदनगर स्वीप केअर असलेल्या ९००२ १० ९००३ या व्हाट्सअप क्रमांकावर स्वतःचे संपूर्ण नाव पाठवावे.
“अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचे उपक्रम देशात व राज्यात गौरवले जात आहेत अशा उपक्रमांच्या माध्यमातून निश्चितच मतदानाचे महत्त्व कळून मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. डीपी- स्टेटस यासारख्या घटकांमध्ये आपणास रस असतो. आपण इतरांचेही डीपी स्टेटस पाहतो. या वैशिष्ट्याचा या उपक्रमात निश्चितच फायदा होणार आहे .प्रशासनाची दोन्ही गाणी अत्यंत प्रेरणादायी आहेत . यांसारखे उपक्रम प्रशंसनीय व अनुकरणीय आहेत ” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले .
उपक्रमासाठी राहुल पाटील(उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ),मीना शिवगुंडे(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),आकाश दरेकर(स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक),डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) , प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार)व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे .