निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी कार्यवाही करावी: सुप्रिया सुळे
पोलीस डायरी, प्रतिनिधी, बारामती :-
महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार माननीय सुप्रियाताई सुळे यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरु घटना, आणि अनैतिक आचरणाने मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली. बारामतीमध्ये विविध ठिकाणी गुंडांच्या टोळ्या फिरत आहेत, विविध तालुक्याच्या ठिकाणी बँक अक्षेपार्ह्पणे रात्रीपर्यंत उघड्या ठेवण्यात आल्यात, भोर व वेल्हा या तालुक्यांमध्ये समोर येत असलेल्या घटनांवर आक्षेप नोंदवत पोलिस व निवडणूक आयोगाने सत्याची भूमिका घेऊन न्याय द्यावा अशी मागणी केली.
#SupriyaSule #Baramati #Tutari