पो.डा. वार्ताहर, पालघर : लोकसभा मतदार संघातील लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, निवडणूक निरीक्षक (सामान्य) अजय सिंग तोमर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजिव जाधवर, तहसिलदार सचिन भालेराव यांच्या उपस्थितित चिन्हाचे वाटप करण्यात आले.
निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार, त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुढीलप्रमाणे : भरत सामजी वनगा, बहुजन समाज पार्टी, चिन्ह (हत्ती), भारती भरत कामडी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), चिन्ह (मशाल), डॉ. हेमंत विष्णू सवरा, भारतीय जनता पार्टी, चिन्ह (कमळ), राजेश रघुनाथ पाटील, बहुजन विकास आघाडी, चिन्ह (शिट्टी), मोहन बारकू गुहे, भारत आदिवासी पार्टी, चिन्ह (हॉकी आणि बॉल), कॉम्रेड राहुल मेढा, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (रेड फ्लॅग), चिन्ह (बॅट), विजया राजकुमार म्हात्रे, वंचित बहुजन आघाडी, चिन्ह (गॅस सिलेंडर), अमर किसन कवळे, अपक्ष, चिन्ह (बॅटरी टॉर्च), दिनकर दत्तात्रय वाढाण, अपक्ष, चिन्ह, (विहीर), मीना किशोर भड, अपक्ष, चिन्ह, (खाट).