आरसेटी तर्फे शेळीपालन प्रशिक्षण
पोलीस डायरी न्यूज, वार्ताहर, बुलडाणा : सेंट्रल बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे देऊळगाव माळी येथे दहा मोफत शेळीपालन प्रशिक्षण पार पडले.
संस्थेचे संचालक संदीप पोटे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना प्रेरित करून संस्थेची माहिती दिली. त्याचबरोबर ध्येयनिश्चिती आणि शासकीय योजनांबद्दल अधिक माहिती देऊन बँकिंग आणि ईडीपीविषयी माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेहकर शाखेचे व्यवस्थापक आशिष मोरे यांनी प्रशिक्षणाला भेट दिली. शेळीपालन प्रशिक्षक ऋषीकुमार फुले यांनी शेळीपालना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक प्रशांत उबरहंडे, मनीषा देव आणि कल्पना पोपळघट यांनी मार्गदर्शन केले.
आरसेटी तर्फे बेरोजगार सुशिक्षित तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास इच्छुकांनी सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.