बुलडाणा, दि. 8 : जिल्हा परिषदेंतर्गत सन 2022-23 वर्षाची अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सुधारीत यादी जाहिर करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप असल्यास दि. 20 जूनपर्यंत सादर करावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या https://zpbuldana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अनुकंपाधारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती ज्येष्ठता यादीवर संबंधितांकडून दि. 20 जून 2023 पर्यंत लेखी आक्षेप मागविण्यात आले आहे. तसेच अनुकंपाधारक उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेत वाढ झाली असल्यास शैक्षणिक वाढीचे कागदपत्रे दिलेल्या कालावधीत सादर करावे. तसेच सदर तात्पुरत्या यादीवर काही आक्षेप असल्यास विहित मुदतीत लेखी सादर करावे. आक्षेपांच्या पडताळणीनंतर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती यादी अंतिम करण्यात येणार आहे. याची अनुकंपाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.