शासन आपल्या दारी अभियानातंर्गत राज्याच्या एकात्मिक फलोत्पादन विभागाने सबसिडीवर फलोत्पादनासाठी निधी उपलब्ध केला आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची विनंती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर यांनी केली आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा समावेश आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध घटकांना अनुदान मर्यादेच्या अधिन राहून निधी देण्यात येणार आहे.
फुले लागवड घटक
अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी प्रती हेक्टर 1 लक्ष रुपये खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल. इतर शेकऱ्यांसाठी 1 लक्ष खर्च मर्यादेत खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रुपये प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल.
कंदवर्गीय फुले
अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी प्रती हेक्टर 1 लक्ष 50 हजार रुपये खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल. इतर शेकऱ्यांसाठी प्रती हेक्टर 1 लक्ष 50 रुपये खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 रुपये प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल.
सुटी फुले
अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी प्रती हेक्टर 40 हजार रुपये खर्च मर्यादेत खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रुपये प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल. इतर शेकऱ्यांसाठी प्रती हेक्टर 40 रुपये खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल.
मसाला पीक लागवड
बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकांसाठी प्रती हेक्टर 30 हजार रुपये खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के रक्कम 12 हजार रुपये प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल. बहुवर्गीय मसाला पिकांसाठी प्रती हेक्टर 50 रुपये एकूण खर्च मर्यादेत खर्चाच्या 40 टक्के 20 हजार प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल.
विदेश फळपिक लागवड
ड्रॅगनफ्रुटसाठी प्रती हेक्टर 4 लक्ष रुपये एकूण खर्च मर्यादेत खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लक्ष 60 हजार रुपये प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल. स्ट्राबेरीसाठी प्रती हेक्टर 2 लक्ष 80 हजार रुपये एकूण खर्च मर्यादेत खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लक्ष 12 हजार प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल. अवॅकॅडोसाठी प्रती हेक्टर 1 लक्ष रुपये एकूण खर्च मर्यादेत खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल.
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन – प्रती हेक्टर 40 हजार रुपये एकूण खर्च मर्यादेत खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीतजास्त 20 हजार प्रती हेक्टर अनुदान दिल्या जाईल.
विदेशी फळे, फूले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या चिकू व मोसंबी या फळबागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.