जिल्हा परिषद व पंचायत समिती सावनेर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी मेळावा व पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती, सावनेर येथे 14 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमास संपूर्ण जिल्हयातील 5 हजार शेतकरी उपस्थित राहतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनी स्थळी अंदाजे कृषी विषयक 80 स्टॉल व जिल्हयातील पशुपक्षी संबधीत 60 स्टॉल निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
जिल्हा स्तरीय कृषी मेळावा व पशु-पक्षी प्रदर्शनीसोबत पशुसंवर्धन विभागांतर्गत पशु-पक्षी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये अत्याधुनिक कृषी औजारे व यंत्रांचे प्रदर्शन अत्याधुनिक सिंचन उपकरणांचे प्रदर्शन विविध पिकांचे नवीन वाणांचा माहितीचे दालन नवीन वैरण जाती, दुधाळु जनावरांचे वैज्ञानिक पध्दतीने संगोपन, विविध कुकुट पालन प्रजातींचे दालन नवीन जैविक व सेंद्रिय खतांचे दालन, काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रक्रियांचे दालन, प्रयोगशील शेतक-यांचे दालन, आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्ताने भरडधान्य लागवड, काढणी पश्चात तंत्रज्ञान व खादय पदार्थाचे दालन, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धउत्पादन तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, सिट्रस इस्टेट ढीवरवाडी ता. काटोल यांचे दालन, उत्पादक कंपन्यांचे दालन अशी विविध दालने राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सुनील केदार असून जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, अॅड. अभिजीत वंजारी, सुधाकर आडबले, प्रविण दटके, आमदार अनिल देशमुख, अँड. श्री. आशिष जैस्वाल, समीर मेघे, राजूभाऊ पारवे, टेकचंदजी सावरकर तर प्रमुख अतिथी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत, कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रविण जोध,अर्थ, क्रिडा व शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे, महिला व बालकल्याण सभापती अंवतिकाताई लेकुरवाळे, समाजकल्याण सभापती मिलिंद सुटे उपस्थित राहणार असून कृषी विषयक तांत्रिक मार्गदर्शनासाठी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यास नागपूर जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रविण जोध यांनी केले आहे.