खाजगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासना’चे नाव, पाटी किंवा स्टीकर लावल्यास होणार कारवाई; सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारींची माहिती
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जळगाव: महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहून व आतील भागात महाराष्ट्र शासन, नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
जर अशा प्रकारची वाहने ज्यावर महाराष्ट्र शासन नाव, लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टीकर चिकटवून वाहने रस्त्यावर फिरतांना आढळून आली तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
खाजगी वाहनांवर किंवा वाहनांत महाराष्ट्र शासन अशा पाटी किंवा बोध चिन्हाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियन व त्याअंतर्गत नियमानुसार कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी सर्व वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.