हायड्रोक्सियुरीया औषधाच्या सेवनाने सिकलसेल रुग्णांचे जिवनमान सुधारते, वारंवार रुगणालयात दाखल होण्याची आवश्यकता भासत नाही, रक्तसंक्रमणाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे सिकलसेल रुग्णांसाठी हायड्रोक्सियुरीया वरदान असून या औषधाचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांनी सिकलसेल रुग्णांना देण्यात आला.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सूर्योदया फेडरेशन यांच्या संयुक्त विदयमाने सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नुकताच इंदीरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय व सर्वेपचार रुग्णालय नागपूर येथे सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड उपस्थित होते. जागतिक सिकलसेल दिनाचे ग्लोबल स्ट्रेटीजी न्यूबॉर्न स्क्रीनींग या घोषवाक्य अंतर्गत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्जीकल कॉम्लेक्स इंदीरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय येथे Hydroxyurea शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरामध्ये डॉ वाकमोडे, डॉ. अरोरा, डॉ वकाने यांनी एकुण 198 रुग्णांची तपासणी केली. तसेच फोलीक अॅसिड व Tab.Hydroxyurea आवश्यकतेनुसार रुग्णांना देण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार रुग्णांच्या रक्त तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या चमुमार्फत करण्यात आल्या एकुण 23 रुग्णांची सीबीसी, 17 रुग्णांची एलएफटी व 10 रुग्णांची केएफटी चाचणी करण्यात आली. शिबीरामध्ये त्याच्या पालकांना समुपदेशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिकलसेल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी तर सुत्रसंचालन सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन कु. संजीवनी सातपुते यांनी केले. शिबीराकरीता सूर्योदया फेडरेशन मार्फत डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी Technical Expert म्हणून या शिबीराची जबाबदारी पार पाडली.
65 वैद्यकिय अधिकारी व स्पेशलीस्ट यांनी हायड्रोक्सियुरीया (Hydroxyurea ) औषधोपचाराचे प्रशिक्षण दिले. शिबीराचे आयोजनाकरीता संजय बिजवे अधिष्ठाता इंदीरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय डॉ बहीरवार (एमओएच), सूर्योदया फेडरेशन च्या अध्यक्ष श्रीमती अग्रवाल डॉ. विकी रगवानी अध्यक्ष आयएमए, डॉ संजय गुज्जनवार वैदयकीय अधिकारी, प्रशांत अतकरे, अरविंद पाल औषध निर्माण अधिकारी, आरबीएसके टीम जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे संपूर्ण युनिट, एनसीडीसेल, सिकलसेल युनिट मधील प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रचीती बाळके, किरण हिंगणकर, रमीत यांनी मोलाचे सहकार्य केले.