चंद्रपूर, दि. 19 : संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने, संपूर्ण देशात एकाच वेळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो . व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मुख्य शासकीय योगदिनाचा कार्यक्रम दि. 21 जून 2023 रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
योग दिनाच्या कार्यक्रमाकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, पतंजली योग समिती चंद्रपूर, पतंजली योगपीठ संस्था व जिल्हा योग संघटनेचे पदाधिकारी तसेच शहरातील नागरीक व खेळाडूंची उपस्थिती राहणार आहे.
नागरिक, योगसाधक, व ज्येष्ठ नागरिकांनी 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील बॅडमिंटन हॉल येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.