मंदिराजवळ प्राण्यांचा बळी देण्यास प्रतिबंध: जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
पोलीस डायरी न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : जिल्ह्यातील विविध यात्रा, तसेच उरुस दरम्यान प्राण्याचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यावेळेस अंधश्रद्धेपोटी कोणत्याही प्राण्याचा मंदिर किंवा श्रद्धास्थळाजवळ बळी दिला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल आहे.
उत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलिस पाटील यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. याबाबत स्थानिक भागात जनजागृती करावी. तसेच उत्सव साजरा करताना प्राण्याचा बळी द्यावयाचा असल्यास मंदिर किंवा श्रद्धास्थळाजवळ देण्यात येऊ नये. त्याची इतरत्र स्वतंत्र व्यवस्था करुन उत्सव साजरा करावा. त्यानंतर सदर जागेची स्वच्छता करण्याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.