कन्नड, गंगापूर, वैजापूर,सिल्लोड येथे निवडणूक प्रशिक्षण निवडणूक कामकाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :- प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे आपल्या ज्ञानाची उजळणी होते आणि त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. प्रशिक्षण घेऊन निवडणूक कामकाजाला जातांना अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जा, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणा दरम्यान प्रोत्साहित केले.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने १०४ सिल्लोड व १०५ कन्नड, १११- गंगापूर व ११२ वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय प्रशिक्षण पार पडले. कन्नड येथे जवाहर नवोदय विद्यालय व सिल्लोड येथे स्वामी विवेकानंद विद्यालय, जळगाव रोड, करुणा निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा स्टेशन रोड, वैजापूर, तसेच भोंडवे पाटील पब्लिक स्कूल बजाजनगर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणाची उपस्थिती याप्रमाणे कन्नड येथे प्रथम सत्रात ४४९ तर द्वितीय सत्रात ५१७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रथम सत्रात ५० तर द्वितीय सत्रात ४३ जणांची गैरहजेरी होती.
गंगापूर येथे दोन्ही सत्र मिळून ८७७ मतदान केंद्राध्यक्ष व सहा. मतदान अधिकारी यांनी प्रशिक्षणाला हजेरी लावली. तर ३५ जण गैरहजर होते. वैजापूर येथे दोन्ही सत्र मिळून ८६३ पैकी ८३२ कर्मचारी हजर होते. तर सिल्लोड येथे पहिल्या सत्रात ५५० पैकी ५०८ तर दुसऱ्या स्त्रात ५६४ पैकी ४६३ उपस्थित होते.
तेथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, उपजिल्हाधिकारी भुसंपादन डॉ. सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी वैजापूर डॉ. अरुण जऱ्हाड, कन्नड तहसिलदार विद्याचरण कडवकर, तहसिलदार सतिष सोनी, स्वरुप कंकाळ, नायब तहसिलदार प्रशांत काळे तसेच साधन व्यक्तिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान काल सुरु झालेल्या पैठण व फुलंब्री मतदार संघासाठी आज प्रशिक्षणाचा दुसरा दिवस होता. या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले.