रत्नागिरी दि 8(पो.डा. प्रतिनिधी : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपल्याने नव्याने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सुमारे 19 जणांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत. ते पुढीलप्रमाणे..
नगरपरिषद सदस्य – प्रविण जाधव. ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी – चंद्रकांत खोपडकर, चंद्रकांत धोत्रे, अल्लाउद्दीन ममतुले, पद्माकर भागवत, सुहेल मुकादम, अंकिता शिगवण, रमजान गोलंदाज, सुशांत जाधव, चंद्रकांत झगडे, श्रीकांत चाळके. वैद्यकीय व्यवसायाचे प्रतिनिधी – डॉ. विकास मिर्लेकर, डॉ. विद्या दिवाण. व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी – सुनिल रेडीज, शकील शेख मजगांवकर. पेट्रोल व गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधी – दत्ताराम लिंगायत, मनिषा कुवेसकर. शेतकरी प्रतिनिधी – दिनकर आमकर, संजय बामणे या सर्वांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मुदत आदेशाच्या दिनांकापासून 3 वर्षे इतकी राहील .